औरंगाबादेतील स्कोडा विस्तारणार!

आदित्य वाघमारे 
रविवार, 8 जुलै 2018

औरंगाबाद - भारतीय बाजारपेठेत आपल्या वाहनांचा टक्का वाढवण्यासाठी स्कोडाने देशात ‘इंडिया २.०’ अंतर्गत ७,९०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत शेंद्रा (औरंगाबाद) येथील प्लॅंटचा विस्तार केला जाणार असून, कंपनीचे अन्य मॉडेलही औरंगाबादेत तयार करण्याची तयारी स्कोडा आणि फोक्‍सवॅगनने सुरू आहे केली आहे.

स्कोडा आणि फोक्‍सवॅगन या ‘सिस्टर कंपनी’ भारतीय कार बाजारपेठेतील टक्का वाढवण्यासाठी आपला विस्तार करणार आहेत. यासाठी ७,९०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या विस्तारासंबंधीचे नियोजन सध्या सुरू असल्याची माहिती कंपनीतर्फे ‘सकाळ’ला देण्यात आली. ‘इंडिया २.०’ या प्रोजेक्‍टअंतर्गत होणाऱ्या या विस्तारात औरंगाबादचाही समावेश करण्यात आला आहे. यातील किती गुंतवणूक औरंगाबादसाठी आहे, यावर अद्याप कंपनीने सांगितले नसले तरी जागतिक दर्जाच्या आपल्या अन्य वाहनांचे उत्पादन औरंगाबादेतून करण्यावर सध्या स्कोडा ऑटोतर्फे विचार सुरू आहे. युरोपियन ब्रॅंड असलेल्या फोक्‍सवॅगनला भारतीय बाजारात मजबुती देण्यासाठी हा प्रयत्न आहे. या माध्यमातून रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर तयार होतील, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

‘लोकलायझेशन’वर देणार भर 
सध्या स्कोडा ऑटो, फोक्‍सवॅगनच्या औरंगाबाद आणि पुणे प्लॅंटमध्ये युरोपातून आलेल्या भागांना असेंबल केले जाते आणि त्या गाड्या भारतीय बाजारपेठेत आणल्या जातात. या वाहनांचे भाग येथेच तयार करून आपल्या उत्पादनांचे ‘लोकलायझेशन’ करण्याचा कंपनीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. २०२० नंतर कंपनीतर्फे उत्पादित वाहनांमध्ये देशांतर्गत तयार झालेल्या भागांचे प्रमाण मोठे असेल असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. यासाठी स्थानिक अभियंत्यांची मोठी मदत लागणार असल्याचे कंपनीने पुढे सांगितले. 

Web Title: Expansion of Skoda in Aurangabad