अनुभवी शिक्षक, शिष्यवृत्तीसाठी "फार्म डी'च्या विद्यार्थ्यांचे उपोषण

अतुल पाटील
सोमवार, 18 जून 2018

औरंगाबाद : शिष्यवृत्ती, मानधन, डॉ. प्रिफिक्‍स, अनुभवी शिक्षक वर्ग, नोकरीच्या संधी तसेच क्‍लिनिकल फार्मसी विभाग सुरु करुन देण्यात यावा, यासाठी शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील 'फार्म डी'च्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. 18) विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले. 
मागण्यासंदर्भात यापूर्वी महाविद्यालय आणि तंत्रशिक्षण कार्यालयास अनेकदा पत्रव्यवहार केला मात्र, त्याचा काहीच परिणाम न झाल्याने विद्यार्थ्यांनी अखेर तंत्रशिक्षण कार्यालयासमोर मंडप टाकून उपोषण केले. 

त्यानंतर अनेक विद्यार्थी संघटना पाठिंब्याचे पत्र देण्यासाठी त्याठिकाणी आल्या. त्यांनी प्रश्‍न उचलून धरण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर दुपारी तंत्रशिक्षणचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून चर्चेला बोलावले. 
फार्म डी अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थ्यांची 2014-15 पासून बंद शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करावी, पदवीपुर्व सेवा करतानाचे पदव्युत्तर शिक्षणाप्रमाणे मानधन चालू करावे, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या परिपत्रकाप्रमाणे पदवी प्रमाणपत्रावर डॉ. प्रिफिक्‍स देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला आदेश देण्यात यावेत, विद्यार्थ्यांना अनुभवी शिक्षक वर्ग उपलब्ध करुन द्यावेत, शासकीय रुग्णालयांमध्ये नोकरीच्या संधी द्याव्यात तसेच, महाविद्यालयासोबत संलग्न असणाऱ्या शासकीय रुग्णालयामध्ये क्‍लिनिकल फार्मसी विभाग सुरु करावा, या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. 

Web Title: For the experienced teachers, scholarships, 'D farm students' hunger strike