सोळा लाखांची "खिचडी' केली फस्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

औरंगाबाद - बनावट पटसंख्या दाखवून मुख्याध्यापकाने गेल्या चार वर्षांत तब्बल 15 लाख 95 हजार 343 रुपये हडपल्याचा प्रकार भगवान महावीर शाळेत समोर आला आहे. दोनवेळा नोटीस बजावूनही शाळेने दखल न घेतल्याने बुधवारी (ता. 16) या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पिसादेवी रोडवरील भगवान महावीर प्राथमिक शाळेत फक्त 49 विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र 300 विद्यार्थी दाखवून पोषण आहार योजनेतून लाखो रुपये हडप करण्यात आले आहेत. शिक्षणाधिकारी एस. पी. जयस्वाल यांनी गेल्या महिन्यात शाळेला भेट दिली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी ता. आठ डिसेंबरला शाळेला नोटीस बजावली; मात्र मुख्याध्यापकाने खुलासा केला नाही. पोषण आहार अधीक्षकांनी दस्तऐवज तपासल्यानंतर अतिरिक्‍त विद्यार्थ्यांच्या नावे दाखवून 15 लाख 95 हजार 343 रुपयांचे अनुदान मिळविल्याचे स्पष्ट झाले. 

शिक्षण विभागाने ता. एक जानेवारीला मुख्याध्यापकाला दुसरी कारणे दाखवा नोटीस दिली; मात्र त्याचीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी मुख्याध्यापकावर गुन्हा नोंदविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शालेय पोषण आहाराचे अधीक्षक बी. ए. देशपांडे यांनी बुधवारी सिडको ठाण्यात तक्रार दिली. 

Web Title: fake attendance shown school

टॅग्स