प्रेयसीच्या खर्चासाठी त्याने छापल्या बनावट नोटा

मनोज साखरे
Friday, 1 November 2019

औरंगाबाद : शिक्षणासाठी तो भोपाळला गेला; पण तिथे प्रेमांकुर फुलला. एका मुलीवर प्रेम जडले. तिच्यासोबत तो राहू लागला. तिच्यावर होणारा खर्च कसा भागवायचा याचा विचार रेल्वे प्रवासात करतानाच यूट्युबवर बनावट नोटांचा व्हिडिओ मिळाला. त्यातील टिप्सने त्याचा या 'धंद्यात' शिरकाव झाला; मात्र सहाच महिन्यांत तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

औरंगाबाद : शिक्षणासाठी तो भोपाळला गेला; पण तिथे प्रेमांकुर फुलला. एका मुलीवर प्रेम जडले. तिच्यासोबत तो राहू लागला. तिच्यावर होणारा खर्च कसा भागवायचा याचा विचार रेल्वे प्रवासात करतानाच यूट्युबवर बनावट नोटांचा व्हिडिओ मिळाला. त्यातील टिप्सने त्याचा या 'धंद्यात' शिरकाव झाला; मात्र सहाच महिन्यांत तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Aurangabad Crime news
पोलिसांनी पकडलेले आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल

शेख समरान ऊर्फ लक्की रशीद शेख असे या तरुणाचे नाव आहे. जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा त्याच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे. संगणक शाखेत बीएस्सी केल्यानंतर त्याने भोपाळ येथे याच शाखेत पदव्युत्तरसाठी प्रवेश घेतला. तेथे त्याचे एका मुलीवर प्रेम जडले. त्यानंतर तो तिच्यावर खर्च करू लागला. तिची हौस पूर्ण करताना त्याचे पैसे संपत होते. मग तिची हौस पूर्ण करण्यासाठी पैसे कसे मिळवावेत याचा तो विचार करीत होता.

Aurangabad Crime News
आरोपीकडून जप्त केलेले प्रिंटर आणि बनावट नोटा

संगणक शिक्षणामुळे तो टेक्‍नोसॅव्ही होताच. रेल्वेत प्रवासादरम्यान यूट्युबवर सर्फिंग करताना बनावट नोटा निर्मितीबद्दल टिप्स मिळाल्या. यानंतर त्याने या चुकीच्या मार्गाचा अवलंब सुरू केला. त्यासाठी त्याने भोपाळवरून प्रिंटर व इतर साहित्य खरेदी केले. ते औरंगाबादला आणून सहा महिन्यांपूर्वी त्याने बनावट नोटा छापण्यास सुरवात केली. तीन महिन्यांपासून त्याला बनावट नोटांच्या 'उद्योगात' गती मिळाली. 

अशी होती मोड्‌स 

दिवाळीदरम्यान संशयितांनी बनावट नोटा खपविल्याची बाब समोर आली. फुलंब्री, बदनापूर, जालना, रांजणगाव शेणपुंजी, वाळूज, नाशिक या भागातही त्याने नोटा खपविल्या. बाजारात वीस रुपयांची खरेदी करून शंभरची बनावट नोट द्यायची आणि खरे ऐंशी रुपये ते विक्रेत्याकडून घेत होते, अशी त्यांची नोटा खपविण्याची मोड्‌स होती.

आता हे वाचा - घरातच असा सुरू होता बनावट नोटांचा कारखाना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake currency for girlfriend expences in Aurangabad