मुद्रा कर्जासाठी बनावट कोटेशन, भाडेकरारनामा, चौघांवर गुन्हा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - मुद्रा कर्जासाठी बॅंकेकडे असंख्य अर्ज येत आहेत; परंतु त्यात बनावट कोटेशन, भाडेकरारनामा आणि इतर कागदपत्रांद्वारे कर्ज उचलण्याचे प्रयत्न होत आहेत. असाच
प्रकार बडोदा बॅंकेच्या निदर्शनास आला असून, या प्रकरणात चौघांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 23) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

याप्रकरणी बीड बायपास रोडवरील बॅंक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापक ज्योती अरुणकुमार पासवान यांनी तक्रार दिली. त्यानुसार सुनील जाधव, रमेश जाधव व इतर दोन महिलांचा
गुन्हा नोंद झालेल्यांत समावेश आहे. भारत सरकारच्या मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जासाठी संशयित सुनील जाधव व दोन महिलांनी 15 फेब्रुवारी 2019 ला अर्ज केला. त्यासोबत
कागदपत्रेही जोडली. या कागदपत्रांची पडताळणी बॅंकस्तरावर झाली.

पडताळणीत अर्जदारांनी कर्जमागणीसाठी बनावट कोटेशन, भाडेकरारनामा दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बॅंकेने अर्जदारांना कर्ज मंजूर केले नाही. याबाबतची माहितीही बॅंकेने अर्जदारांना पत्राद्वारे कळविली. पत्र प्राप्त झाल्यानंतर 26 मे 2019 ला दहा ते बारादरम्यान सुनील जाधव, रमेश जाधव व
दोन महिला बॅंकेत आल्या. रमेश जाधव यांनी कर्ज न दिल्यावरून शिवीगाळ करून धमकावले. तसेच कर्ज मंजूर न केल्याचा राग धरून 14 ऑगस्टला बॅंकेचे उपक्षेत्रप्रमुख व तक्रार निवारण अधिकारी अजित सिंग यांना धमकावले. शासकीय कामात अडथळा व फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com