रस्त्यावर कचरा फेकाल तर पाच हजारांचा दंड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

औरंगाबाद - शहरातील घनकचरा व्यवस्थापनाला शिस्त लावण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली असून, दंडाचे नवे नियम तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार आता रस्त्यावर कचरा फेकला तर दीडशे रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची रक्कम तुमच्याकडून वसूल केली जाऊ शकते. बुधवारी (ता. ११) या नव्या नियमांना सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. 

बंद वाहनांतून प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करण्यासाठी प्रशासनाने खासगी एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव बुधवारी सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. त्यात जबर दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच एक हजार लोकसंख्येमागे एक रिक्षा याप्रमाणे चारचाकी ३०० रिक्षा (ऑटोटिप्पर), १५० हॅन्डकार्ट प्रत्येकी एका हेल्परसह, २२ हायड्रोलिक टेंपो, नऊ कॉम्पॅक्‍टर्स ज्यांची क्षमता १८ घनमीटर असेल, त्यासाठी एक वाहनचालक व दोन हेल्परही पुरवावे लागतील. सध्याचे महापालिकेचे १४ हजार मजूर झाडण्याच्या कामावर लावण्यात येतील, असे नमूद करण्यात आले आहे. 

एकाच एजन्सीला काम देण्यास विरोध 
एकाच एजन्सीला संपूर्ण शहरातील काम देण्यास काही नगरसेवकांनी विरोध केला आहे. एजन्सीसोबत वाद झाल्यास संपूर्ण शहरातील काम ठप्प होते, असा मुद्दा माजी महापौर भगवान घडामोडे यांनी मांडला. 

असे असेल शुल्क 
निवासी मालमत्तांकडून प्रतिदिन १ रुपयाप्रमाणे वार्षिक ३६५ रुपये. 
व्यावसायिक भागातून प्रतिदिन २ रुपये याप्रमाणे ७२० रुपये. 
हॉटेल, मोठ्या व्यावसायिकांकडून प्रतिदिन १० ते १०० रुपये.
२.२० लाख निवासी व २२,५०० व्यावसायिकांकडून १० कोटींची वसुली.
असा आहे दंड 
बल्क गारबेज रस्त्यावर कचरा टाकल्यास - ५ हजार रुपये.
नागरिकाने रस्त्यावर कचरा टाकल्यास - १५० रुपये.
व्यावसायिकांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास - ५०० रुपये.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे - १०० रुपये.
उघड्यावर लघुशंका करणे - १०० रुपये.
उघड्यावर शौच करणे - ५०० रुपये.

Web Title: False trash on road and penalty of five thousand