कौटुंबिक वादातून तरुणाने पोलिस ठाण्यातच घेतले पेटवून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

कौटुंबिक वादातून एका विवाहित तरुणाने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पोलिस ठाण्यातच पेटवून घेतल्याची घटना रविवारी (ता.14) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येथे घडली. शेख सद्दाम शेख अहमद (वय 28) असे त्याचे नाव असून, तो 90 टक्के भाजला आहे. आग विझवताना एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला.

हिमायतनगर (औरंगाबाद) - कौटुंबिक वादातून एका विवाहित तरुणाने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पोलिस ठाण्यातच पेटवून घेतल्याची घटना रविवारी (ता.14) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येथे घडली. शेख सद्दाम शेख अहमद (वय 28) असे त्याचे नाव असून, तो 90 टक्के भाजला आहे. आग विझवताना एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला.

पोलिस निरीक्षक रवींद्र बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दाम हा भुसार व्यापारी असून त्याचा पत्नीशी वाद आहे. त्यांच्या भांडणातून त्याने रविवारी थेट पोलिस ठाणे गाठून ठाण्याचा आवारात रॉकेल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले ठाणे अंमलदार सखाराम चव्हाण व इतर पोलिसांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यात पोलिस कर्मचारी चव्हाण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला नांदेडला हलविण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family Dispute youth Burned in police station