महिलेचा गर्भपात करून जिवे मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

वसमत येथील एका महिलेचा गर्भपात करून विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाशीम येथील सासरच्या चौघांवर बुधवारी (ता. 24) जणांवर वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली : वसमत येथील एका महिलेचा गर्भपात करून विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाशीम येथील सासरच्या चौघांवर बुधवारी (ता. 24) जणांवर वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशीम येथील देव पेठ भागातील दिपाली नरेश मारगपवार या विवाहितेचा सासरची मंडळी करीत होती. वॉटर फिल्टर प्लांट व दवाखाना  टाकण्यासाठी माहेराहून पैसे आणण्यासाठी त्यांचा छळ केला जात होता. सासरचा छळ असह्य झाल्याने श्रीमती मारगपवार ह्या वसमत येथे माहेरी राहण्यासाठी आल्या त्यानंतर त्यांनी बुधवारी तारीख 24 वसमत शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. यामध्ये सासरच्या मंडळींनी पैशाच्या मागणीसाठी त्यांचा छळ केला. तसेच त्यांच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करून विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे तक्रारीत नमूद केले आहे.

यावरून वसमत शहर पोलिसांनी वाशीम येथील नरेश दत्ता मारगपवार राम दत्ता मागपवार  यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना वाशिम पोलीस ठाण्यांतर्गत असल्यामुळे वसमत शहर पोलिसांनी हा गुन्हा वाशिम पोलिसांकडे वर्ग केल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: family tried to murder a woman after abortion