कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बेंबर (ता. भोकर) येथे शुक्रवारी (ता. 28) सकाळी नऊच्या सुमारास घडली. 

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बेंबर (ता. भोकर) येथे शुक्रवारी (ता. 28) सकाळी नऊच्या सुमारास घडली. 

भोकर तालुक्यातील बेंबर येथील शेतकरी मारोती लक्ष्मण जगदंबे (वय 25) यांच्या शेतात मागील तीन वर्षापासून सतत नापिकी होत होती. कोरडवाहू शेती असल्याने त्या शेतीची मदार पावसाच्या पाण्यावर असते. मात्र तीन वर्षापासून या भागात सतत अवर्षन होत असल्याने शेतातील उत्पन्न घटले. यामुळे नापिकी होऊन मारोती जगदंबे हे कर्जबाजारी झाले. यातून त्यांनी बँकेचे व काही खाजगी कर्ज काढले. परंतु शेतातील उत्पन्न घटल्याने कर्जाची परतफेड वेळेत होत नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शेवटी त्यांनी आपल्या शेतावर जाऊन शुक्रवारी सकाळी किटकनाशक प्राशन केले.

बेशुध्दावस्थेत पडलेल्या मारोती जगदंबे यांना नातेवाईकांनी नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सूरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मण मारोती जगदंबे यांच्या माहितीवरुन भोकर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक श्री. कऱ्हाळे हे करीत आहेत. 

Web Title: farmer commit suicide for loan