सरण रचून, कर्जबाजारी शेतकऱ्याचे आत्मदहन 

सरण रचून, कर्जबाजारी शेतकऱ्याचे आत्मदहन 

उमरी : तालुक्यातील मौजे तुराटी येथिल एका साठ वर्षाच्या शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जाला कंटाळून स्वताःच्या शेतात माडवाच्या लाकडाने स्वंताचे अंत्यविधीचे सरन रचून त्यावर बसुन अग्नीने पेट देऊन आत्महत्या केले. सदरची घटना शुक्रवारी (ता. 9) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली असल्याचे गावचे सरपंच दिलीप सावंत यांनी सांगितले.

तुराटी येथिल शेतकरी पोत्तन्ना रामन्ना बलपीलवाड (वय 60 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोत्तन्ना यांच्यावर भारतीय स्टेट बँक एसबीआय चे  दोन लाख व जिल्हा मध्यर्वती बॅंकेचे 40 हजार रुपये कर्जे होते. यात नापिकी मुळे कर्जे कसे फेड होईल व मुलीच्या लग्नाचे दोन वर्षापूर्वीचे कर्ज न फिटल्याने आता कसे होईल या विवेंचनात स्वताःच्या शेतात जाऊन माडंवाचे लाकडे घेऊन पेट देऊन आत्महत्या केली. पोत्तन्ना यांच्यामागे पाच मुली, एक मुलगा, पत्नी असा परिवार असल्याची माहिती तुराटी येथील सरपंच दिलीप सावंत यांनी दिले. आम्ही सदर घटनेचीही माहिती उमरी पोलिसात दिल्याचे त्यांच्याकडून सांगण्यास आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com