मानोलीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

निवृत्ती मोरे यांनी सततची नापिकी व कर्जास कंटाळून आत्महत्या केली.

मानवत - तालुक्यातील मानोली येथील शेतकरी निवृत्ती लक्ष्मण मोरे (वय 40) या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी (ता. 28) सकाळी साडेचार वाजता घडली. 

निवृत्ती मोरे यांनी सततची नापिकी व कर्जास कंटाळून आत्महत्या केली. महेंद्रा फायनान्सचे दिड लाख रुपये व एस. बी. एच. बँकेचे दिड लाख कर्ज झाले होते.

सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मानोली येथे मागील दोन महिन्याच्या कालावधीत तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.

Web Title: The farmer committed suicide in manoli

टॅग्स