उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

गोकुंदा (नांदेड) : किनवट तालुक्यातील नागझरी कॅम्प येथील रहिवासी शेतकरी दत्ता नामदेव भालेराव (वय 48) यांचा बुधवारी (ता. 22) पहाटे पाचच्या दरम्यान मृत्यू झाला. 

मंगळवारी (ता. 21) दिवसभर ऊन्हात शेतात कडबा बांधून झाल्यावर ते घरी आले. तेव्हा रात्री त्यांना उलट्या झाल्या. सकाळी रेल्वेने त्यांना नांदेड येथे उपचारासाठी नेण्याकरिता  किनवट रेल्वे स्थानकावर ते पहाटेच आले. रेल्वे स्थानकावर च त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. सायंकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer death due to heat stroke