वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

शेतावर काम करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ यात गंभीर जखमी झाल्याची घटना माळबोरगाव (ता. किनवट) शिवारात मंगळवारी (ता. २९) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

नांदेड - शेतावर काम करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ यात गंभीर जखमी झाल्याची घटना माळबोरगाव (ता. किनवट) शिवारात मंगळवारी (ता. २९) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. 

माळबोरगाव (ता. किनवट) येथील शेतकरी मधुकर रामकिशन मोरे (वय ४०) हे आपला भाऊ प्रभाकर मोरे यांच्यासोबत शेतावर काम करण्यासाठी गेले होते. शेतात काम करतांना अचानक आकाशात ढग दाटून आले. काही क्षणातच विजांच्या कडकडाटासह धो- धो पाऊस सुरू झाला. अगोदर शेतातील बांधावर अशलेल्या झाडाचा आसरा घेतला. परंतु पाऊस मोठा सुरू झाल्याने त्यांनी आपल्याच शेतातील झोपडीत आसरा घेतला. यावेळी झोपडीवरच वीज पडून यात मधुकर मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ प्रभाकर हा गंभीर जखमी झाला. त्याच अवस्थेत त्यांनी घरी निरोप पाठविला.

नातेवाईकांनी शेताकडे धाव घेतली. यावेळी तहसिलदार व पोलिस निरिक्षकांना या घटनेची माहिती दिली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांमार्फत घटनास्थळी जाऊन पंचानामा केला. मधूकर मोरे यांचा मृतदेह किनवट येथील सरकारी रुग्णालयात दाखल केला. उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर प्रभाकर मोेरे यांच्यावर उपचार सुरू आहेत. किशन कदम यांच्या माहितीवरून किनवट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करणयात आली आहे. तपास पोलिस हवालदार श्री. बोंडलेवाड करित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer death by electrocution