विष घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

सेनगाव (जि. हिंगोली) - कर्जाला कंटाळून विष घेतलेल्या भानखेडा (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील शेतकरी माणिक लष्कर पवार (वय 52) यांचा अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी (ता. 1) मृत्यू झाला. त्यांची दोन एकर शेती असून, मुलींच्या लग्नासाठी बॅंकेकडून दीड लाख कर्ज घेतले होते. शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने ते रोजंदारीवर काम करीत होते. कर्ज, नापिकीमुळे आलेल्या नैराश्‍यातून त्यांनी 22 एप्रिलला विष घेतले होते.
Web Title: farmer death by poison