साठवण तलावात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

औसा (जि. लातूर) - साठवण तलावातील मोटार काढण्यासाठी गेलेल्या तुंगी (ता. औसा) येथील शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. बालाजी गुंडू भावले (वय 50) हे सोमवारी (ता. 18) सायंकाळी दापेगाव साठवण तलावातील आपली मोटार पाहण्यासाठी गेले होते. पाण्यात असलेल्या विद्युत मोटारीपर्यंत ते गेले असता, आजूबाजूला गाळ असल्याने त्यांचे पाय गाळात रुतून बसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. औसा पोलिस ठाण्यात सुभाष भावले यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: farmer death in sathvan lake drown