esakal | बीडमधील शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

बीडमधील शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

सणासाठी पैसा नसल्याने शेळी आणली होती विक्रीला

बीडमधील शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आष्टी - पोळा सण जवळ आल्याने पैशांची तजवीज करण्यासाठी कडा येथील बाजारात शेळी विक्री करण्यासाठी आलेल्या तालुक्‍यातील खुंटेफळ येथील रघुनाथ थोरवे (वय 60) यांचा रविवारी (ता. 25) सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला.

बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या असून, आर्थिक मंदी आली आहे. बाजारपेठ ठप्प आहे. शेतकऱ्यांनी खरीप पीक लागवडीवर खर्च केला; पण पावसाअभावी पीक हातचे गेल्यात जमा आहे.

शेतकऱ्यांकडचा पैसा संपला आहे. सर्वसामान्य शेतकरी आपल्याकडील वस्तू विकून उदरनिर्वाह करू लागले आहेत. श्री. थोरवे पोळा सणानिमित्त खर्चाला दोन पैसे मिळावेत म्हणून शेळी कडा येथील बाजारात विक्रीसाठी घेऊन गेले होते. या वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला.

loading image
go to top