भोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

केदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. या पाण्यात मेरखेडा (ता. भोकरदन) येथील शेतकरी वसंत क्षीरसागर (वय 55) हे शुक्रवारी दुपारी वाहून गेले.

घटनास्थळी चार तास उशिरा पोचलेल्या प्रशासनाकडून सायंकाळी सात वाजेपर्यंत क्षीरसागर यांचा शोध सुरू होता. क्षीरसागर नदीकाठी गुरे चारत असताना एक गाय पाण्यातून दुसऱ्या थडीवर गेली, गाईला आणण्यासाठी ते पाण्यातून जात असताना अंदाज न आल्याने ते वाहून गेले. माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने घटनास्थळी पोचण्यास तब्बल चार तास लागल्याने ग्रामस्थांमध्ये रोष होता. प्रशासनाने दोन नावांच्या साह्याने साडेसहा वाजेपर्यंत शोध मोहीम राबविली. मात्र क्षीरसागर यांचा शोध लागला नाही.

Web Title: Farmer Drown in River