'जलसंधारणाच्या कामात शेतकऱ्यांनी सहभाग वाढवावा'

नवनाथ इधाटे
गुरुवार, 28 जून 2018

चौका येथे जलपूजन
फुलंब्री तालुक्याच्या जलसंधारण कामाच्या पाहणीसाठी दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी चौका येथे जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. त्यामध्ये जलसंधारण विभागामार्फत दुरुस्ती करण्यात आलेल्या पाझर तलाव, नदी खोलीकरण झालेल्या कामाची पाहणी करून जलसंधारणाच्या कामात नव्याने साचलेल्या पाण्याचे जलपूजन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच जयश्री संतोष वाघ, उपसपंच भोरासिंग कायटे, अनुलोम संस्थेचे भाऊसाहेब मते, ग्रामविकास अधिकारी जे.डी.शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शंकर बोगाणे, संजय न्यायाधीश, अशोक क्षिरसागर, गणी मौलाना, ज्ञानेश्वर गिरी आदींची उपस्थिती होती.

फुलंब्री : शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या कामात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आपले गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच शासनाच्या सर्व विभागाचे प्रतिनिधी विविध योजनेच्या माध्यमातून तुमच्या सोबत राहणार आहे. त्यामुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या सारख्या योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. फुलंब्री तालुक्यातील मुर्शीदाबादवाडी, रेलगाव आणि खामगाव येथील जलसंधारण कामाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.26) केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

पुढे बोलतांना श्री.चौधरी म्हणाले की, या वर्षी फुलंब्री तालुक्यात चांगल्या पद्धतीने जलसंधारणाचे कामे करण्यात आलेले आहे. दरवर्षी याच पद्धतीने जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे करून आपला तालुका पाणीदार करण्यासाठी सर्व यंत्रानेनी एकत्रित रित्या काम काम करावे. सर्व विभागाच्या यंत्रनेने आपण करत असलेल्या कामाचे नियोजन करावे. तसेच शासनाने आता नव्याने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही चांगली योजना अंमलात आणली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या परिसरात असलेल्या धरणातून गाळ काढून आपल्या शेतशिवारात टाकला पाहिजे. जेणे करून शिवार पिकांनी चांगल्या पद्धतीने फुलेल. एखाद्या ठिकाणी या योजनेला काही किरकोळ अडचणी येत असेल तर त्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या. फुलंब्री तालुक्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्याने नद्या, नाले, सिमेंट बांध, माती बांध आदी भरून वाहिले आहे. त्यामुळे या भागात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे विहिरीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. प्रत्येक गावामध्ये जलसंधारणाचे चांगले काम झाले तर नक्कीच फुलंब्री तालुका पाणीदार होऊ शकतो. याप्रसंगी तहसीलदार संगीता चव्हाण, मुर्शीदाबादवाडीचे सरपंच सदाशिव विटेवर, खामगावच्या सरपंच नंदा मनोहर सोनवणे, उपसरपंच जगन्नाथ सोनवणे, मनोहर सोनवणे, केशवराव सोनवणे, कारभारी काटकर आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

चौका येथे जलपूजन
फुलंब्री तालुक्याच्या जलसंधारण कामाच्या पाहणीसाठी दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी चौका येथे जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. त्यामध्ये जलसंधारण विभागामार्फत दुरुस्ती करण्यात आलेल्या पाझर तलाव, नदी खोलीकरण झालेल्या कामाची पाहणी करून जलसंधारणाच्या कामात नव्याने साचलेल्या पाण्याचे जलपूजन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच जयश्री संतोष वाघ, उपसपंच भोरासिंग कायटे, अनुलोम संस्थेचे भाऊसाहेब मते, ग्रामविकास अधिकारी जे.डी.शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शंकर बोगाणे, संजय न्यायाधीश, अशोक क्षिरसागर, गणी मौलाना, ज्ञानेश्वर गिरी आदींची उपस्थिती होती.

Web Title: farmer include in water save movement