शेतकऱ्यांप्रश्‍नी लोकसभेचे अधिवेशन बोलवा - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नांदेड - कर्जमाफीची आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही. दुसरीकडे अब्जाधीश असलेल्या बॅंक बुडव्यांचे कर्ज माफ करण्यासाठी दोन लाख ४१ हजार कोटी बॅंकांना देऊन त्यांचा एनपीए कोरा केला आहे. त्यामुळे आता देशातील शेतकऱ्यांसमोर देशव्यापी आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. शेतीचा प्रश्न गंभीर बनला असून, या प्रश्नावर लोकसभेचे अधिवेशन घ्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. आठ) येथे पत्रकार परिषदेत केली.

श्री. शेट्टी म्हणाले, की धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. राज्यातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रतीक म्हणून त्यांच्या गावातून एक मेपासून संघटनेतर्फे शेतकरी सन्मान यात्रा सुरू करण्यात आली आहे. खान्देश, विदर्भ दौरा करून ही यात्रा आज नांदेडमध्ये पोचली. बुधवारी (ता. नऊ) उस्मानाबाद जिल्ह्याच्या शिराढोण गावात यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेदरम्यान आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटी दिल्या. त्यांना संघर्ष करून आत्मसन्मानाने जगण्यासंदर्भात प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.   शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देशाच्या २७ राज्यांना भेटी देऊन अभ्यास केला. सर्वच ठिकाणी शेतकरी त्रस्त आहे आणि केंद्राचे धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. त्यामुळेच देशातील १९३ संघटना एकत्र येऊन १० मे रोजी दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर आंदोलन करण्यात येणार आहे. शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांचा माल त्वरित खरेदी करावा, शेतीमालाची निर्यात थांबवावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्याला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी मदत करावी, अशा मागण्या आहेत, असे ते म्हणाले.

Web Title: farmer loksabha session raju shetty politics