वादळी वार्‍याने ज्वारी झाली भूईसपाट

विलास शिंदे
रविवार, 9 डिसेंबर 2018

सेलू : यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकाच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे. रब्बीच्या झालेल्या थोड्याफार पेरण्यात शेतकर्‍यांनी कमालीचे कष्ट करून जगविलेली दिड एक्कर ज्वारी शनिवारी (ता.८) दूपारी चारच्या सुमारास झालेल्या वादळी वार्‍याने भूईसपाट झाली आहे.

हातनूर ( ता.सेलू ) येथिल शेतकरी अशोक शेषराव नागटिळे यांनी आपल्या दोन एक्कर शेतात रब्बीच्या ज्वारी पिकाची पेरणी केली. थोड्याफार ओलीवर केलेली ज्वारी तर्राट वाढली. पोटर्‍यात आलेल्या ज्वारीला परिसरातील रान डूकरे, निलगायी पासून बचाव करण्यासाठी या शेतकर्‍याने कमालीचे कष्ट करून चौहू बाजून घरातील साड्या बांधून कुंपण घातले.

ज्वारीला येत्या आठ दिवसात कणशेही लागणार होते. त्यातच निसर्गाच्या अवकृपेने शनिवारी जोराचा वादळी वारा आला अन् दोन एक्कर ज्वारीतील दिड एक्कर ज्वारी बघता बघता भूईसपाट झाली. हाता तोंडांशी आलेले ज्वारीचे बहारदार पिक असे वादळी वार्‍याने हिरावून घेतल्याने या माझ्या कुटूंबावर उपासमारिची वेळ आली असल्याच्या भावना शेतकरी अशोक नागटिळे यांनी 'सकाळ' बोलतांना व्यक्त केली.

Web Title: farmer loss jower crop due to Storm