शेतकरी कांदा चाळीच्या अनुदानापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

वैजापूर - राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी कांदा चाळीच्या उभारणीसाठी शासनाकडून  मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम तालुक्‍यातील बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना येथील स्टेशन रोडलगत असलेल्या कृषी विभाग कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. 

याबाबत तालुका कृषी अधिकारी अनिल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कांदा चाळीचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविले आहे. अद्यापपर्यंत किती शेतकऱ्यांना अनुदान वाटप झाले याबाबतची माहिती जिल्ह्याच्या वरिष्ठ कार्यालयातून मिळेल, असे श्री. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

कांदा या पिकाची नगदी पीक म्हणून ओळख असल्या कारणाने तालुक्‍यात कांद्याची एकूण १२ हजार हेक्‍टर इतक्‍या  क्षेत्रात लागवड केली जाते. प्रतिहेक्‍टरी सुमारे २२ टन कांद्याचे उत्पादन निघत असल्याने कांद्याच्या साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना कांदाचाळीची उभारणी करणे महत्त्वाचे असते.

२०१७- १८ या वर्षासाठी येथील कृषी विभागाला ३५० कांदाचाळ उभारणीसाठी अनुदान वाटप लक्षांक होता; परंतु कृषी विभागाने उद्दिष्टापेक्षाही जास्तीच्या म्हणजेच ५१३ कांदाचाळीसाठी सुमारे चार कोटी ५० हजार रुपयांचे अनुदान वाटपासाठीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले आहे. हे प्रस्ताव सोडतपद्धतीने काढले जातात व यासाठी तीन हजार २०० अर्ज आले होते. ४०, २० या मापाची कांदाचाळ उभारणीसाठी शासनाकडून ८७ हजार ५०० रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. कांदाचाळ उभारणीसाठीचे अनुदान मिळविण्याकरिता अगोदर कृषी विभागाकडून त्याबाबत पूर्वसंमती घेणे आवश्‍यक असते. विभागाकडून पूर्वसंमती आल्यानंतर १५ दिवसानंतर शेतकऱ्यांनी कांदाचाळ उभारणी करायला हवी. अनुदान मंजूर झाल्यानंतर रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येते. अशी माहिती श्री. कुलकर्णी यांनी दिली. मार्च महिन्याच्या अखेर कांदाचाळीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते; परंतु अद्यापपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमाच झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: farmer onion subsidy