शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

जालना - पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे यंदा जुलै महिना उजाडला तरी जिल्ह्यातील पेरण्या पूर्ण झाल्या नाहीत. यामुळे उडीद, मूग पिकांचा पेरणीचा हंगाम संपल्यात जमा आहे. तर कापसाच्या उत्पादन घटीसह रोगराई पाडण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.

उडीद, मुगाची स्थिती
जिल्ह्यात सरासरी १३ हजार ३७६ हेक्‍टर क्षेत्रावर उडिदाचा पेरा अपेक्षित आहे; मात्र पावसाअभावी तीन हजार ८०७ हेक्‍टर क्षेत्रावर पेरा झाला आहे; तसेच सरासरी ३१ लाख ४९७ हेक्‍टर क्षेत्रावर मुगाचा पेरा अपेक्षित आहे; मात्र आजघडीला जिल्ह्यात मुगाचा केवळ सात हजार ९९५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आता जुलै महिना उजाडल्याने आता उडीद, मुगाचे पीक घेणे अवघड आहे.

कपाशी लागवडीची स्थिती
जिल्ह्यात कपाशीची सरासरी दोन लाख ९७ हजार ९९२ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड अपेक्षित आहे; मात्र सद्यःस्थितीमध्ये केवळ ८१ हजार २६३ हेक्‍टरवर कपाशी लागवड झाली आहे. कपाशी लागवडीस उशीर होत असल्यामुळे उत्पादनात घट होऊन किडीच्या प्रादुर्भावाचा परिणाम होण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.

अंबड तालुका कोरडाठाक 
अंबड - अंबड तालुक्‍यात अल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. तर अनेकांनी कोरड्यातच कपाशी, तूर, मका, बाजरी, मुगाची पेरणी, लागवड केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्‍यता आहे.

Web Title: farmer rain water