जनावरांसहित शेतकऱ्यांचा ग्रामीण बॅंकेवर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

- किट्टी आडगांवात अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन
- जनावरांसहित शेतक-यांचा ग्रामीण बॅंकेवर मोर्चा
- जनावरांना चारा दावणीला देण्याची मागणी

माजलगांव (बीड) : शेतक-यांकडील कर्ज व इतर महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे, दुष्काळी अनुदान देण्यात यावे, जनवरांना चारा दावणीला देण्यात यावा या मागण्यांसाठी मंगळवारी (ता. एक) तालुक्यातील किट्टी आडगांव येथील महाराष्ट् ग्रामीण बँकेच्या शाखेवर मोर्चा काढला. तर याप्रश्नी शासनाने दखल घ्यावी याकरीता सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अन्नत्याग सत्याग्रह आंदोल सुरू केले आहे.

मागील तिन वर्षांपासुन दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतक-याला करावा लागत आहे. खरिप हंगामामध्ये अत्यल्प उत्पादन झाले तर रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. जनावरांना चाराही उपलब्ध नाही. कर्जमाफीचा घोळ अद्यापही मार्गी लागलेला नाही, शेतकरी, शेतमजूर व जनता दुष्काळाने होरपळत आहे.

याप्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नविन वर्षाच्या सुरूवातीस ता. 1 मंगळवारी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करत शेतक-यांनी जनावरांसहीत ग्रामीण बॅंक किट्टी आडगांव येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते

Web Title: Farmer Rally On Rural Bank with animals