बोंडअळीने त्रस्त शेतकऱ्याने तीन एकर कपाशीवर फिरविला रोटावेटर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पद्मावती (ता. भोकरदन) येथील शेतकरी रमेश पाटील तराळ यांनी आपल्या मालकीच्या तीन एकर क्षेत्रात कपाशी पिकाची लागवड केली होती. मागच्या वर्षी बोंड अळीच्या हल्ल्यात कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले होते.

वालसावंगी : महागडी औषधफवारणी करून सुद्धा बोंड अळीवर नियंत्रण मिळविता येत नसल्याने, नैराश्यातून शेतकऱ्यांवर तीन एकर कपाशी पिकावर रोटावेटर फिरवण्याची नामुष्की आली.                              

पद्मावती (ता. भोकरदन) येथील शेतकरी रमेश पाटील तराळ यांनी आपल्या मालकीच्या तीन एकर क्षेत्रात कपाशी पिकाची लागवड केली होती. मागच्या वर्षी बोंड अळीच्या हल्ल्यात कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून रमेश तराळ यांनी महागडी औषधी फवारणी केली. पिकाची योग्य निगा राखली. पाण्याचे नियोजन केले. त्यामुळे पीक सुरुवातीला बहारदार अवस्थेत होते. मात्र ऐन कपाशी फुलोऱ्यात आली असताना. बोंड अळीने हल्ला चढविला. मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा उगम झाल्याने उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलटे अळीचे प्रमाण वाढतच गेले. त्यामुळे हताश होऊन तीन एकर क्षेत्रावरील कपाशी पिकावर रोटावेटर फिरवावा लागला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: A farmer rotated a trunk on his three acres farm because of bondali