सेलू तालुक्‍यामध्ये शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

सेलू - रवळगाव (ता. सेलू) येथील शेतकरी शिवाजी जिजाभाऊ रोडगे (वय 60) यांनी शेतातील शेडला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 17) सकाळी उघडकीस आले. त्यांनी शेतीसाठी बॅंक, खासगी सावकाराकडून कर्ज काढले होते. नापिकीमुळे कर्जफेड कशी करावी, या विवंचनेत ते होते. सोमवारी रात्री जेवण झाल्यावर, शेतात जातो, असे घरच्यांना सांगून ते घराबाहेर पडले. सकाळी घरी न आल्यामुळे घरच्यांनी शोध घेतला असता गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळले. याबाबत त्यांचा पुतण्या रामेश्वर प्रल्हाद रोडगे यांनी सेलू पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलिस उपनिरीक्षक शंकर पांढरे तपास करीत आहेत.
Web Title: farmer suicide