दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांची बीड जिल्ह्यात आत्महत्या

दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांची बीड जिल्ह्यात आत्महत्या

बीड - नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना रविवारी बीड तालुक्‍यातील बहादरपूर व ढालेगाव (ता. गेवराई) येथे घडल्या.

ढालेगाव येथील शेतकरी सुभाष गंगाधर तौर (वय 50) यांनी रविवारी सकाळी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. गेल्या वर्षी कापसाचे बोंड अळीने झालेले नुकसान आणि यंदाही तीच परिस्थिती असल्याने सुभाष तौर हताश होते. त्यांच्या कुटुंबीयांकडे राष्ट्रीयीकृत बॅंकेचे कर्जही आहे. दुसरी घटना तालुक्‍यातील बहादरपूर येथे घडली. सत्यवान हौसराव कोळेकर (वय 26) या तरुण शेतकऱ्यानेही नापिकी आणि कर्जामुळे मध्यरात्री घरातील आडाला गळफास लावून आत्महत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com