नापिकी, कर्जबाजारीपणाने दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

परभणी, नांदेड - परभणी, नांदेड जिल्ह्यांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

परभणी, नांदेड - परभणी, नांदेड जिल्ह्यांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
विष घेतलेल्या टाकराळ (ता. हिमायतनगर) येथील शेतकरी पंडित जयवंतराव हाके (वय 34) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. उदरनिर्वाह चालेल एवढी त्यांची शेती असून नापिकीमुळे अपेक्षित उत्पादन हाती येत नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ लागली. त्यांनी कर्ज काढून पुन्हा पेरणी केली; मात्र यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले. बॅंकेचे कर्ज कसे फेडावे, घरगाडा कसा चालवावा या विवंचनेत असलेल्या हाके यांनी 27 नोव्हेंबरला शेतावर विष घेतले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी (ता. एक) त्यांचे निधन झाले. पत्नी जयश्री हाके यांनी दिलेल्या माहितीवरून तामसा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

Web Title: farmer suicide