सोयगाव तालुक्‍यात शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

बनोटी - नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून तिडका (ता. सोयगाव) येथील शेतकरी सुरजीलाल पूनमचंद झेलवार (वय 70) यांनी आत्महत्या केली. जंगलीकोठा शिवारात त्यांनी आत्महत्या केल्याचे शनिवारी (ता. आठ) उघडकीस आले.

बनोटी - नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून तिडका (ता. सोयगाव) येथील शेतकरी सुरजीलाल पूनमचंद झेलवार (वय 70) यांनी आत्महत्या केली. जंगलीकोठा शिवारात त्यांनी आत्महत्या केल्याचे शनिवारी (ता. आठ) उघडकीस आले.

सुरजीलाल झेलवार यांच्याकडे अकरा एकर शेती असून, त्यांच्यावर बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या बनोटी शाखेचे एक लाख तीस हजार, सेवा संस्थेचे एक लाख, नातेवाईक, खासगी सावकारांचे दोन लाख असे चार लाख रुपये कर्ज आहे. तीन वर्षांपासूनचा सततचा दुष्काळ, नापिकी, मुलगा अपंग असल्याने कुटुंबांचा पडलेला सर्व भार त्यांच्यावर होता. यावर्षी त्यांनी शेतात पूर्णपणे कपाशीची लागवड केली होती. उत्पादनात घट आल्याने झालेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे दोन महिन्यांपासून ते निराश होते. कोणाबरोबरही व्यवस्थित बोलत नव्हते. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतच आठवडाभरापासून ते घरच्यांना न सांगता ते निघून गेले होते. सर्वत्र शोध घेऊनही ते सापडले नाहीत. जंगलीकोठा शिवारात एका झुडपात त्यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शनिवारी सकाळी आढळला. त्याच्या मृतदेहाजवळ विषारी औषधाची पुडी सापडली. बनोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार जी. ए. जागडे, ठाणे अंमलदार एस. एस. पवार, कॉन्स्टेबल योगेश झाल्टे, प्रदीप पवार करीत आहेत.

Web Title: farmer suicide