औरंगपूरला शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

नापिकी, बॅंकेचे कर्ज व पाऊस नसल्याने एका शेतकऱ्याने लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगपूर (ता. परळी वैजनाथ) येथे आज पहाटे उघडकीस आली.

सिरसाळा (जि. बीड) - नापिकी, बॅंकेचे कर्ज व पाऊस नसल्याने एका शेतकऱ्याने लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगपूर (ता. परळी वैजनाथ) येथे आज पहाटे उघडकीस आली.

अशोक गोपाळ लहाने (वय 32) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. अशोक यांना दोघे भाऊ मिळून तीन एकर जमीन आहे. नापिकी, बॅंकेचे कर्ज कसे फेडावे आणि पुन्हा पावसाने दिलेली ओढ यामुळे ते काही दिवसांपासून तणावात होते. यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Suicide in Aurangpur