कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 31 मे 2018

नांदेड - सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्यांने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना उमरी तालुक्यातील तळेगाव येथे बुधवारी (ता. ३०) रोजी घडली. 

नांदेड - सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्यांने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना उमरी तालुक्यातील तळेगाव येथे बुधवारी (ता. ३०) रोजी घडली. 

उमरी तालुक्यात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने शेतातील उत्पादन घटले. याचा फटका तळेगाव येथील शेतकरी दिलीप काशिनाथ नरवाडे (वय २५) यांनाही बसला. त्यांच्या शेतात उत्पादन घटल्याने संसाराचा गाडा चालविण्यासाठी त्यांनी कर्ज काढले. परंतु या कर्जाची परतफेड वेळेत होत नसल्याने ते चिंतेत राहायचे. कर्जदार दारावर आल्यांनतर त्यांना किती दिवस खोटे बोलायचे व वेळ मारून नेयायची हे त्यांना जमत नसल्याने अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. 

बुधवारी (ता. ३०) दुपारी तीनच्या सुमारास तळेगाव शिवारात असलेल्या पांडूरंग शिंदे यांच्या शेतावर जावून त्यांच्या विहिरीत दिलीप नरवाडे यांनी उडी घेऊन आत्महत्या केली.

Web Title: Farmer Suicide because of loan