किनवट तालुक्‍यात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

नांदेड - सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून नामदेव विठ्ठल सलाम (वय 40) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना किनवट तालुक्‍यातील बोथ (ता. किनवट) येथे सोमवारी (ता. 5) दुपारी घडली. तीन वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे सलाम कर्जबाजारी झाले होते. या वर्षी अतिवृष्टी झाल्याने हातातील हंगाम गेला. यामुळे ते खचून गेले होते. त्यातून त्यांनी काल शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: farmer suicide in kinwat tahsil