मानवत तालुक्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरुच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

मानवत तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. दोन महिन्यांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मानवत : तालुक्यातील ताडबोरगाव येथील शेतकरी दत्तराव सोपानराव शेळके (वय 62) यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केली. तालुक्यात ही मागील दोन महिन्यातील चौथी शेतकरी आत्महत्या आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे तालुक्यातील ताडबोरगाव येथील दत्तराव शेळके यांनी रविवारी (ता १) सकाळी 6 च्या सुमारास आपल्या शेतातील लिंबाच्या झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास लावत आत्महत्या केली. त्यांच्या नावे 76 आर जमीन असून SBI बॅक मानवत शाखेचे त्यांच्याकडे कर्ज असल्याचे समजते.त्यांच्या पशचात आई ,पत्नी, दोन विवाहित मुले असा परिवार आहे.

कापसाच्या पिकाचे बोंड अळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मागील काही दिवसापासून ते आर्थिक अडचणी होते. या प्रकरणी मानवत पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: farmer suicide in Manvat