शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर बाळंतीण पत्नीने पेटवून घेतले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जून 2016

शिराढोण - नापिकी, कर्जफेडीच्या विवंचनेने शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेला पाच दिवस होत नाहीत, तोच त्याच्या बाळंतीण पत्नीने पेटवून घेऊन जीवन संपविले. पतीच्या आत्महत्येमागची विवंचना तिलाही सतावत होती. चार वर्षांच्या चिमुकलीसह सव्वा महिन्याच्या अर्भकाला दुष्काळ, नापिकीने पोरके करून गेल्याच्या या घटनेने पाडोळी (नायगाव, ता. कळंब) येथे हळहळ व्यक्त होत आहे.

दहा एकर शेती असूनही गेल्या चार वर्षांपासून सततची नापिकी, सोसायटीचे 72 हजार रुपये कर्ज, त्याचा वाढत जाणारे व्याज, यंदाही मृग नक्षत्र कोरडे गेल्याने न झालेली पेरणी आदींमुळे पाडोळी गावातील महेंद्र श्रीराम टेकाळे व सुप्रिया टेकाळे हे शेतकरी दाम्पत्य विवंचनेत होते. आता जगायचे कसे, या नैराश्‍येतून महेंद्र टेकाळे यांनी गेल्या शुक्रवारी (ता. 24) घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांची पत्नी, सव्वा महिन्याची बाळंतीण असलेली सुप्रिया टेकाळे (वय 29) हिने सोमवारी (ता. 27) मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास पेटवून घेतले. झोपेत असलेल्या कुटुंबातील सदस्यांना आरडाओरडीमुळे जाग आली. त्यांनी तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सकाळी सहाच्या सुमारास सुप्रिया टेकाळे हिचा मृत्यू झाला. पाडोळी (ना.) येथे दुपारी दोनला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दाम्पत्याची चार वर्षांची मोठी मुलगी आणि वीस महिन्यांची चिमुकली दुखःचा डोंगर कोसळलेल्या आजीच्या मांडीवर बसलेली पाहून ग्रामस्थांच्या मनाचीही कालवाकालव झाली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: farmer suicide in marathwada