कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 27 जून 2018

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने एेन पेरणीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 25 ते 26 जूनच्या दरम्यान पींपळकुंठा (मुखेड) शिवारात घडली. 

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने एेन पेरणीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 25 ते 26 जूनच्या दरम्यान पींपळकुंठा (मुखेड) शिवारात घडली. 

मुखेड तालुक्यातील बीजूर येथील शेतकरी देविदास गणपती सुरनर (वय 36) यांच्या शेतावर मागील काही वर्षापासून नापिकी होत होती. यामुळे त्याने कर्ज काढले होते. यावर्षी चांगला पाऊस पडेल या आशेवर त्याने महागामोलाचे बी शेतात टाकले. परंतु पावसाने अचानक उघडीप दिल्याने शेतातील पीक करपु लागले. आता काय करायचे. कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत असलेल्या देविदास सुरनर याने पिंपळकुठा शिवारात जाऊन पळसाच्या झाडाला दस्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 26 जूनच्या सकाळी सहा वाजता उघडकीस आली. जयसिंग गणपती सुरनर यांच्या माहितीवरून मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करणयात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक खेडकर हे करीत आहेत. 

Web Title: farmer suicide in nanded