नांदेड जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

कंधार तालुक्यातील बामणी येथील घटना

नांदेड: सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कंधार तालुक्यातील बामणी येथे आज (सोमवार) सकाळी सात वाजता उघडकीस आली.

कंधार तालुक्यातील बामणी येथील घटना

नांदेड: सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कंधार तालुक्यातील बामणी येथे आज (सोमवार) सकाळी सात वाजता उघडकीस आली.

कर्जबाजारी शेतकरी दत्ता दशरथ कदम (वय 48) यांच्याकडे वडिलोपार्जीत चार एकर शेती होती. त्यापैकी गतवर्षी मुलीच्या लग्नाला एक एकर शेती विकली. दुसरी मुलगी लग्नाला आली आहे. तिचे लग्न करण्यासाठी शेतातून उत्पन्न निघत नव्हते. सतत चार वर्षापासून नापिकी, दुष्काळ यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. मराठवाडा ग्रामिण बँकेचे कर्ज असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

दत्ता कदम हे रविवारी रात्री घरून शेतावर जातो म्हणून निघाले. परंतु सोमवारी त्यांचा मृतदेह शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी त्यांच्या शेताकडे धाव घेतली. उस्माननगर पोलिसांना ही माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पाटील हे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृत्तदेह शवविच्छदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला. सायंकाळी दत्ता कदम यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी उस्माननगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer suicide in nanded district