नांदेड जिल्ह्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱयाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

नांदेड: सततची नापिकी व कर्जबाजारी पणामुळे विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने आपल्या शेतात जावून विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना मुखेड तालुक्यातील जांभळी येथे घडली.

नांदेड: सततची नापिकी व कर्जबाजारी पणामुळे विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने आपल्या शेतात जावून विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना मुखेड तालुक्यातील जांभळी येथे घडली.

जांभळी (ता. मुखेड) येथील शेतकरी परबतराव प्रभाकर हिवराळे (वय 48) हे अल्पभुधारक शेतकरी होते. त्यांच्या शेतात मागील तीन वर्षापासून सतत नापिकी होत होती. यातच घरगाडा कसा चालवायचा आणि काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत ते वावरत असे. गेल्या काही दिवसांपासून ते घरच्यांशी विक्षीप्ततपणे वागत होता. अखेर त्यांनी आपल्या शेतात जावून रविवारी (ता. 14) दुपारी विष प्राशन केले. त्यांना नांदेडच्या शासकिय रूग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ऐन पेरणीच्या तोंडावर तरूण शेतकऱ्याने केलेली आत्महत्या या परिसरात हळहळीचा विषय ठरला आहे.

दरम्यान, या प्रकरणी रेखाबाई परबतराव हिवराळे यांच्या माहितीवरून नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नायक श्री. गिते हे करीत आहेत.

Web Title: farmer suicide in nanded district