कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

विहामांडवा (जि. औरंगाबाद) - चौंढाळा (ता. पैठण) येथील बद्री विनायकराव काळे (वय 40) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी (ता. 11) विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

विहामांडवा (जि. औरंगाबाद) - चौंढाळा (ता. पैठण) येथील बद्री विनायकराव काळे (वय 40) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी (ता. 11) विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

नातवाईकांनी दिलेल्या माहितीनूसार बद्री काळे यांना दोन एकर शेतजमीन आहे, त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. सतत नापिकीमुळे कर्जबाजारी झाल्याने ते अनेक दिवसांपासून नैराश्‍यात होते. दरम्यान, गेल्या वर्षभरात विहामांडवा परिसरातील गावांमधील बारा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवन संपविले आहे.

Web Title: farmer suicide poison