विषारी कीटकनाशक पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंडअळीमुळे केलेला खर्च निघणार नाही. उत्पादन घटणार या विवंचनेतून त्यांनी सोमवारी (ता.6) रात्री पावणेआठच्या सुमारास विषारी कीटकनाशक औषधी घेतले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर औरंगाबाद येथील घाटीत उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. आढणे यांचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला.

कायगाव : कायगाव (ता.गंगापूर) येथील शेतकरी गोरखनाथ भीमराज ओढणे (वय 45) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. औरंगाबाद येथील घाटीत उपचारादरम्यान मंगळवारी (ता.7) त्यांचा मृत्यू झाला.

कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंडअळीमुळे केलेला खर्च निघणार नाही. उत्पादन घटणार या विवंचनेतून त्यांनी सोमवारी (ता.6) रात्री पावणेआठच्या सुमारास विषारी कीटकनाशक औषधी घेतले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर औरंगाबाद येथील घाटीत उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. आढणे यांचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला.

कायगाव परिसरात  कपाशी गुलाबी बोंडअळीने थैमान घातल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यातूनच शेतकऱ्यांचा बळी गेल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Farmer Suicide with Poison