शेतात जाळून घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

पूर्णा - येथील शेतकरी गंगाधर मोतीराम कदम (वय 48) यांनी शेतातच जाळून घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. तीन वर्षांपासून शेतात काहीच पिकले नाही. घरखर्च कसा चालवावा, या विवंचनेत ते होते. नेहमीप्रमाणे बुधवारी ते शेतात गेले. ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी चौकशी सुरू केली. त्यांचा मुलगा गणेश आज दुपारी शेतात गेला असता त्याला वडील गंगाधर यांचा जळालेला मृतदेह दिसला. नापिकीमुळे वडील विवंचनेत होते, त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे गणेशने पूर्णा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
Web Title: farmer suicide in purna