रेल्वेखाली उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

वसमत - कर्जाला कंटाळून लोण बुद्रुक (ता. वसमत) येथील तरुण शेतकऱ्याने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. 21) सकाळी उघडकीस आली. शेतकरी मारुती विठ्ठल मुळे (35) यांना एकत्रित कुटुंबात तीन एकर जमीन आहे. काही महिन्यांपासून मारुती मुळे हे बॅंक, सावकारी कर्जामुळे चिंतेत होते. त्यातच त्यांच्या मुलाच्या पायावर दोन वेळेस शस्त्रक्रिया करावी लागल्याने ते अधिकच आर्थिक अडचणीत सापडले होते. यावेळच्या हंगामातून कर्ज फेडता येईल या आशेने त्यांनी पेरणी केली होती. मात्र, पावसाने खंड दिल्याने त्यांना दुबार पेरणीची भीती सतावत होती. बुधवारी (ता. 20) कोणालाही काहीच न सांगता ते घराबाहेर पडले होते.
Web Title: farmer suicide railway