लग्नाच्या एक दिवस आधी शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

मानवत - वडिलांकडील कर्ज कसे फिटेल, या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने लग्नाच्या एक दिवस आधी गळफास घेऊन आत्महत्या केली. सारंगापूर (ता. मानवत) येथे सोमवारी (ता. 15) ही हृदयद्रावक घटना घडली.

मानवत - वडिलांकडील कर्ज कसे फिटेल, या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने लग्नाच्या एक दिवस आधी गळफास घेऊन आत्महत्या केली. सारंगापूर (ता. मानवत) येथे सोमवारी (ता. 15) ही हृदयद्रावक घटना घडली.

सारंगापूर येथील शेतकरी शिवाजी राठोड यांचे पुत्र कैलास राठोड यांचे मंगळवारी (ता. 16) लग्न होते. आज रात्री त्यांना हळद लागणार होती. आपले वडील शेतकरी असून मागील तीन-चार वर्षांपासूनचा दुष्काळ, सततची नापिकी आदींमुळे शेतातून कोणतेही उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे शेतीपायी झालेले कर्ज वडील कसे फेडतील, आपले लग्न झाल्यावर वाढणारा कर्जाचा बोजा कसा उतरेल या विवंचनेत कैलास राठोड होते. ते आज आपल्या शेतात गेले. तेथील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. लग्नाची हळद लागण्यापूर्वीच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलून मृत्यूला कवटाळल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. सुरेश पाते यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.

Web Title: farmer suicide in sarangapur