कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; भोकर तालुक्यातील घटना

प्रल्हाद कांबळे
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

 सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोळगाव (ता. भोकर) शिवारात शनिवारी (ता. 17) सकाळी अकरा वाजता घडली.
 

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोळगाव (ता. भोकर) शिवारात शनिवारी (ता. 17) सकाळी अकरा वाजता घडली.

भोकर तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी योगेश विठ्ठलराव गायकवाड (वय 30) याच्या शेतावर मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. त्यातच घरगाडा चालविण्यासाठी त्याने कर्ज काढले होते परंतु शेतातील उत्पन्न घटले व हाताला काम नसल्याने कर्जाची परतफेड ते वेळत करु शकत नव्हता.

अखेर या दुहेरी संकटात सापडलेल्या योगेश गायकवाड यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आणि शेवटी शनिवारी सकाळी तो आपल्या शेतावर गेला. शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी उघडकीस आली. त्यानंतर नातेवाईकांनी धावाधाव केली.

भोकर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह भोकरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी प्रविण विठ्ठलराव गायकवाड यांच्या माहितीवरुन भोकर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सुर्यवंशी हे करीत आहेत.

Web Title: farmer suicides in Bhokar taluka