नापीकीला कंटाळून माहूर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

बालाजी कोंडे
शनिवार, 30 मार्च 2019

सततची नापीकी व कर्जास कंटाळून माहूर तालुक्यातील इवळेश्वर येथील पन्नास वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.30) घडली. इवळेश्वर मधील प्रेम राम राठोड (वय 50) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

माहूर : सततची नापीकी व कर्जास कंटाळून माहूर तालुक्यातील इवळेश्वर येथील पन्नास वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.30) घडली. इवळेश्वर मधील प्रेम राम राठोड (वय 50) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

प्रेम राठोड सकाळी नऊच्या सुमारास शेतात जात असल्याचे सांगून घरून बाहेर पडले होते. त्यानंतर गावाशेजारील असलेल्या शेतात सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान एका बाभळीच्या झाडाला गळफास घेवून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजले.

राठोड यांनी सततची नापीकी व बँकेचे असलेले कर्ज यामुळे आत्महत्या केल्याची चर्चा ईवळेश्वर येथील ग्रामस्थामध्ये सुरु आहे. चरण विठ्ठल राठोड यांनी दिलेल्या माहितीवरून माहूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिस निरिक्षक लक्ष्मण राख, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक मेश्राम, जमादार गजानन कुमरे, पोलीस कर्मचारी देशमुख घटनेचा तपास करित आहेत. 

Web Title: Farmer suicides in Mahur taluka