आईने हाक मारली तेव्हा तो मृतावस्थेत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

सेलू : वयस्कर आईने पहाटे आवाज दिला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही. घरात पाहणी केली तेव्हा तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला आणि तिने हंबरडा फोडला. कर्जाला कंटाळून धामणगाव (ता. सेलू, जि. परभणी) येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा हा हृदयद्रावक प्रसंग. श्रीकृष्ण कारभारी डख (वय 36) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

श्रीकृष्ण डख यांची बावीस एकर कोरडवाहू शेती असून शेतीसाठी दोन बॅंकांतून कर्ज काढले होते. सततच्या नापिकीमुळे कर्जफेड कशी करावी, या विवंचनेत ते होते. नेहमीप्रमाणे आज पहाटे साडेपाचला ते उठले. दूध गरम करायला आईला सांगितले. दरम्यानच्या काळात घरातील खोलीत गळफास घेऊन जीवन संपविले. दूध गरम झाल्यावर आईने हाक मारली तेव्हा प्रतिसाद मिळाली नाही. खोलीत डोकावल्यावर तिला मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. पोलिस पाटील अशोक डख यांनी सेलू पोलिस ठाण्यात माहिती दिली. सहायक निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांनी पंचनामा केला. 

विष पिऊन आत्महत्या 
हिंगोली : गोरलेगाव (ता. कळमनुरी) येथील शेतकरी धोंडबाराव भवानराव पतंगे (वय 82) यांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास शेतात विष घेऊन आत्महत्या केली. 
त्यांनी बॅंकेतून चाळीस हजारांसह खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्जफेडीच्या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली. 

Web Title: farmer suside marathvada