'मुख्यमंत्र्यांनी सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासन पाळावे '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

औरंगाबाद - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला; तसेच लेखी आश्‍वासनही दिले आहे. विधानसभेत दिलेला शब्द पाळावा लागेल. कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा, यावर शिवसेना ठाम असून, यासाठी अधिक आक्रमक होऊ, असा इशारा पालकमंत्री तथा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला. आपण चंद्रकांत पाटील यांना ओळखत नाही. मी फक्त मुख्यमंत्र्यांना ओळखतो, असा टोलाही त्यांनी या वेळी मारला. 

खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर सोमवारी (ता. 24) पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, की कर्जमुक्ती करावी हा विषय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर ठाम आहे. शिवसेनेने गावागावांत जाऊन आंदोलन केले आहे. विधानसभेतही आवाज उठविला आहे. कर्जमुक्तीसाठी आम्ही दिल्लीतही गेलो. यामध्ये कोण काय म्हणते, याला महत्त्व नाही. मी मुख्यमंत्र्यांना ओळखतो. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होऊन सातबारा कोरा झाला पाहिजे, यासाठी शिवसेना आक्रमक असून, याप्रश्‍नी तसुभरही मागे हटणार नाही. दरम्यान, भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कर्जमुक्तीचा निर्णय जाहीर केला. मग महाराष्ट्रात असा निर्णय का घेत नाही, असा प्रश्‍न पालकमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राज्य सरकारला टोला लगावत येथे अभ्यास चालू असल्याचे सांगितले. 

Web Title: farmers 7/12 issue