esakal | शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात जेवण करत केले ठिय्या आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

परभणी : अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात जेवण करत केले ठिय्या आंदोलन.

शेतकरी संभाजी प्रल्हाद दूधाटे, गोदावरी देवराव गायकवाड, गोविंद तुकाराम दुधाटे या तीन शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली नव्हती. तरी गेल्या दोन वर्षांपासून वीजबिल त्यांना दिले जात होते.

शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात जेवण करत केले ठिय्या आंदोलन

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : जिल्ह्यातील Parbhani गोळेगाव (ता.पूर्णा) Purna येथील तीन शेतकऱ्यांना Farmer वीज जोडणी नसतानाही वीज बिल येत आहे. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता.सहा) महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांच्या Superidendent Of Engineer दालनात ठिय्या आंदोलन केले. या प्रसंगी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी अभियंत्यांच्या दालनातच जेवण सुरु केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसले. गोळेगाव येथील ३६ शेतकऱ्यांनी वीज जोडणीची मागणी केलेली होती. शेतकरी संभाजी प्रल्हाद दूधाटे, गोदावरी देवराव गायकवाड, गोविंद तुकाराम दुधाटे या तीन शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली नव्हती. farmers agitation while take meal in mahavitran office in parbhani

हेही वाचा: PHOTOS : गंगागिरी महाराजांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

तरी गेल्या दोन वर्षांपासून वीजबिल त्यांना दिले जात होते. याबाबात शेतकऱ्यांनी सतत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली, असतांनाही अधिकाऱ्यांकडून विलंब केला जात होता. अखेर आज मंगळवारी स्वाभिच्या पदाधिकाऱ्यांसह अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांच्या दालनात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.

हेही वाचा: मोदींच्या मंत्रिमंडळात भागवत कराड?,खासदार मुंबईला रवाना

दालनातच ठिय्या आंदोलनादरम्यान जेवण करण्यास सुरुवात केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. शेतकऱ्यांचा Swabhimani Shetakari Sanghatana हा पवित्रा पाहता काही वेळेतच आगामी तीन दिवसांत या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन श्री.अन्नछत्रे यांनी दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी किशोर ढगे, जाफर तिरोडकर, भास्कर खटिंग, गजानन तुरे, रामभाऊ अवरगंड, बाळासाहेब घाटूळ, दिगंबर पवार, उद्धव जवंजाळ, अॅड. संजय शिंदे, मधुकर चोपडे, राम दुधाटे, शिवाजी दुधाटे, तुकाराम दुधाटे, मारोती गायकवाड, नागेश दुधाटे, विठ्ठल दुधाटे, गोविंद दुधाटे यांचासह शेतकरी उपस्थित होते.

loading image