शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी "सामर्थ्य' क्रिकेटच्या मैदानात

अतुल पाटील
शनिवार, 1 डिसेंबर 2018

क्रिकेट लीग म्हटले कि, प्रत्येकाचे उद्देश ठरलेले. औरंगाबादच्या सामर्थ्य प्रतिष्ठाननेही क्रिकेटचे सामने भरवले. यांनी मात्र, वेगळेपण जपत सामन्यांमधून उभारलेला निधी सामाजिक कार्यासाठी खर्च करायचा ठरवला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि 106 विद्यार्थ्यांचे आरोग्य विमा यातून काढले जातील. सामर्थ्यच्या क्रिकेट लीगचा रविवारी (ता. 2) अंतिम सामना होत आहे. 

औरंगाबाद : क्रिकेट लीग म्हटले कि, प्रत्येकाचे उद्देश ठरलेले. औरंगाबादच्या सामर्थ्य प्रतिष्ठाननेही क्रिकेटचे सामने भरवले. यांनी मात्र, वेगळेपण जपत सामन्यांमधून उभारलेला निधी सामाजिक कार्यासाठी खर्च करायचा ठरवला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि 106 विद्यार्थ्यांचे आरोग्य विमा यातून काढले जातील. सामर्थ्यच्या क्रिकेट लीगचा रविवारी (ता. 2) अंतिम सामना होत आहे. 

क्रिकेटच्या सामन्यांचा खर्च लीगमधील आठ संघांनीच उचलला आहे. सहभागी खेळाडू, मित्र, कुटूंबीय निधी उभारणार आहेत. तेवढीच रक्‍कम प्रतिष्ठानतर्फे त्यात टाकली जाणार आहे. अंतिम सामन्यातील विजेतेही ही रक्‍कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत निधीमध्ये देणार आहे. विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याहस्ते अंतिम सामन्याची नाणेफेक होणार आहे. त्यानंतर जमा निधी एखाद्या प्रकल्पाला किंवा सरकारी खात्यात जमा केला जाईल. तसेच यावेळी उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला एक झाड देण्यात येणार आहे. 

सामर्थ्य प्रतिष्ठानच्या कार्याला आठ वर्षापासून सुरवात केली. प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. नोंदणी झाल्यानंतर "मैत्रीसाठी क्रिकेट' ही पहिल्यांदाच सामने खेळवले जात आहेत. या माध्यमातून मराठा समाजातील सगळ्या स्तरातील लोकांना एकत्रित आणले. यात उद्योजक, अभियंते, प्राध्यापक, वकील, डॉक्‍टर, बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद, सरकारी अधिकारी सहभागी झाले आहेत. एमजीएमच्या क्रिकेट मैदानावर रविवारी सकाळी आठ ते अकरा वाजेदरम्यान, लीगचा अंतिम सामना होणार असून यानिमित्त त्यांचे मित्र आणि कुटूंबियांनाही निमंत्रीत केले आहे.

विद्यार्थ्यांना आरोग्य विमा 
शहरात छत्रपती शिवाजी वसतिगृह आहे. तेथील 106 विद्यार्थ्यांचा एक वर्षाचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे. तो अंतिम सामन्यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात सुपूर्द करण्यात येईल.

Web Title: For Farmers and students Samrthya in cricket ground