पिकविम्यापासून शेतकरी वंचित, नेट सेंटर चालकांकडून कबुली 

तानाजी जाधवर
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

उस्मानाबाद : पंतप्रधान पिक विमा योजना राबिवताना विविध तांत्रीक अडचणी आल्याने सीएससी चालकांच्यासमोरील समस्या वाढल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी यापासून वंचित राहिल्याचेही या सीएससी चालकांनी अधिकृत पणे सांगितले आहे. त्यानी जिल्हा कृषी कार्यालयाला पत्र देऊन या समस्या मांडल्या आहेत. 

उस्मानाबाद : पंतप्रधान पिक विमा योजना राबिवताना विविध तांत्रीक अडचणी आल्याने सीएससी चालकांच्यासमोरील समस्या वाढल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी यापासून वंचित राहिल्याचेही या सीएससी चालकांनी अधिकृत पणे सांगितले आहे. त्यानी जिल्हा कृषी कार्यालयाला पत्र देऊन या समस्या मांडल्या आहेत. 

या पत्रात म्हटले आहे की, पंतप्रथान पिक विमा योजनेचे सर्व्हर सतत बंद चालु होत होते, त्यामुळे शेतकऱ्यांचे पिक विम्याची रक्कम भरुन देखील अनपेड दाखवित आहे. त्यांना पावती देता आली नसल्याची पहिली त्रुटी समोर आली आहे. त्यानंतर बँकेतून पैसे कपात होऊन देखील सीएससी वॉलेटला पैसे जमा न झाल्या कारणाने काही शेतकऱ्यांचे फॉर्म भरता आले नसल्याची कबुली या चालकांनी दिली आहे. सर्व्हरच्या त्रुटीमुळे काही शेतकऱ्यांचे पिक विम्याचे पैसे दोन ते तीनदा भरल्याचीही उदाहरणे आहेत.

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य दरम्यानच्या काळात झाले नाही. सूरुवातीला कार्यशाळा घेत असताना सर्व्हरच्या कोणत्याही त्रुटी निर्माण होणार नाही, याची शाश्वती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधीनी दिली होती. त्याची पुर्तता त्यांच्याकडून झाली नाही. अद्यापर्यंत चालकांकडे शेतकऱ्यांचे फॉर्म भरणे शिल्लक आहे. 24 तासाच्या आत वॉलेटला न जमा झालेली रक्कम बँक खात्यावर जमा होणे आवश्यक होते, तरीही अद्यापपर्यंत ती रक्कम बँक खात्यात जमा झाली नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फॉर्म भरता आले नाहीत. काही शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक व आय.एफ.एस.सी कोड माहिती पोर्टलच्या त्रुटीमुळे काही बदल चुकीचे झाले. त्यामुळे भविष्यात त्या शेतकऱ्यांचा पिक विमा जमा नाही झाला तर यास सर्वस्वी हे पोर्टल जबाबदार राहील असही पत्रात म्हटले आहे.

सद्य स्थितीत ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म सर्व्हर मेन्टनन्समुळे भरणे बाकी राहिले आहे. ते शेतकरी भविष्यात वितरीत कऱण्यात येणाऱ्या विमा रक्कमेची मागणी करत आहेत. तसेच शेतकरी व सीएससी चालकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. या सर्व त्रुटी असल्यामुळे पिक विमा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी किंवा सेंटरकडे राहिलेले सर्व फॉर्म बँकेत ऑफलाईन पध्दतीने स्विकारण्यासाठी शासनाकडून परिपत्रक काढण्यात यावे अशी मागणी पत्रामधुन कऱण्यात आली आहे.

Web Title: farmers are deprived from crop insurance