शेतकरी पिक विमा भरणा करण्यापासून वंचित,..या आहेत अडचणी

तानाजी जाधवर
शुक्रवार, 20 जुलै 2018

उस्मानाबाद - राज्यात खरीप हंगामातील पीक विमा भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असल्याने तांत्रिक अडचणीचा सामना शेतक-यांना करावा लागत आहे. 24 जुलै पर्यंत हा कालावधी निश्चित करण्यात आला असला तरी अजुनही जिल्ह्यातील दहा टक्के देखील शेतकऱ्यांचा विमा भरणा होऊ शकलेला नाही. जिल्ह्यातील नेटची सेवा देणारे देखील यामुळे हैराण झाले आहेत. विमा भरण्यासाठी रात्रभर जागून काम करण्याची वेळ येत आहे. तरीही वेबसाईटवर वारंवार लोड वाढत असून, विमा भरला जात नाही. 

सीएससी चालक देखील यामुळे त्रस्त झाले आहेत. एक-एका सेंटरकडे सुमारे एक हजार फॉर्म पडून आहेत. शिवाय दिवसभर शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देऊन सीएससी चालक देखील कंटाळले आहेत. शेतक-यांना तर त्याहुन अधिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

फॉर्म भरला जातो मात्र पावती कोरीच येणे, आधार कार्ड मॅच न होणे, आधार कार्ड पाच वेळा रजिस्टर आहे यापेक्षा जास्त वेळ स्वीकारले जाणार नाही असे एरर दाखवले जातात. वेबसाईट under maintaince आहे असे येत असल्याने नवीन फॉर्म घेण्यास सीएससी चालकांनी बंद केले आहे. शेतकरी विविध ठिकाणी फिरताना दिसत आहेत. 
शिवाय वेबसाईट सुरू झाली तरीही एका फॉर्मला सुमारे दोन तास वेळ वाया जात असल्याचे दिसुन येत आहे.  यामुळे एका रात्रीत 10 ते 15 सुध्दा शेतकऱ्यांचा विमा देखील भरला जात नाही.

जे फॉर्म सीएससी चालकांकडे जमा आहेत तेच फॉर्म भरले नाही गेले तर काय होईल. असाही प्रश्न समोर उभा आहे. यामुळे नवीन फॉर्म घेण्यास सीएससी चालकांनी बंद केले आहे. शेतकऱ्यांची सुद्धा फरफट वाढली असुन, दिवसभर मानसिक तापाला कंटाळलेला सीएससी चालक रात्रभर वेबसाईटच्या तापाला कंटाळला आहे. एवढे करुनही अर्ज भरले जात नसल्याने अडचणीत वाढ होत आहे. 

अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. पण वेबसाईट अत्यंत स्लो असुन, खुप वेऴ वाया जात आहे. आता नवीन अर्ज घेणे सुध्दा शक्य होत नाही. 
सुहास साळुंखे - सीएससी चालक 

Web Title: Farmers are deprived from making a payment insurance,..These are the difficulties