संततधार पावसाने नांदेडमधील शेतकरी सुखावला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

नांदेडमध्ये शुक्रवारी (ता. १९)  झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शनिवारी (ता. २०) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात सरासरी १८.१८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभरात एकूण २९० .९५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १९)  झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शनिवारी (ता. २०) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात सरासरी १८.१८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभरात एकूण २९० .९५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १५८.४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात १६.७६ टक्के पाऊस झाला आहे. हा पाऊस बिलोली मंडळात ९० मिलीमीटर झाल्यामुळे या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात सलग दोन दिवसाच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांची कामे सुरु झाली आहेत. तर उगवलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. 

तालुकानिहाय झालेला पाऊस
(पाऊस मिलीमीटरमध्ये)
नांदेड - १८.७५, मुदखेड - १०, अर्धापूर - २.३३, भोकर - २९, उमरी - ३७.३३, कंधार - ३०.१७, लोहा - १९.८३, किनवट - शुन्य, माहूर - ०.५०, हदगाव - ०.२९, हिमायतनगर - शुन्य, देगलूर - २५.१७, बिलोली - ४९.६०, धर्माबाद - १९.६७, नायगाव - ३३.६०, मुखेड - १४.७१. आज अखेर पावसाची सरासरी १५८.४८.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers are happy for continuous rain in Nanded